कसाई मुलगा ! दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानं आईचा केला खून

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आईनं दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला, म्हणून एका मुलानं तिची निर्घृण हत्या केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 12:12 PM IST

कसाई मुलगा ! दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानं आईचा केला खून

नाशिक, 23 जुलै : आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आईनं दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला, म्हणून एका मुलानं तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी कमलाकर काळे याला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून कमलाकरनं आपल्या 82 वर्षीय आईला मारहाण केली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. कांताबाई काळे असं मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(पाहा : VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण)

पैशांसाठी दारुड्या मुलाने केली वृद्ध बापाची हत्या

दरम्यान, गेल्या महिन्यात अशीच काहीशी घटना सांगलीतही घडली होती. पैशांसाठी एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध बापाची हत्या केली. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे इथली ही घटना आहे. म्हैस विकल्यानंतर मिळालेल्या पैशांसाठी दारूच्या नशेत मुलाने वडिलांची दांडक्याने मारहाण करून हत्या केली. हरी पाटील (वय-81)असं मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं नाव आहे. तर आरोपी मुलाचं नाव लक्ष्मण पाटील असे आहे.

(पाहा :VIDEO: गडचिरोलीतील मुलींच्या निवासी शाळेचा प्रश्न ऐरणीवर)

Loading...

चिकुर्डे येथील टाकळी वसाहतीत राहणाऱ्या लक्ष्मणला बऱ्याच वर्षांपासून दारूचं व्यसन होतं. त्यामुळे वेळोवेळी आईवडिलांना तो मारहाण करत होता. तर हरी पाटील हे गेली चार वर्षापासून लकवा झाल्याने अंथरुणात झोपून होते. पती आजारी असल्याने पत्नी ताराबाई यांनी घरातील म्हैस विकली होती. त्यातील 10 हजार देण्याची लक्ष्मणने आईकडे मागणी केली होती. मात्र आईनं न दिल्यानं रागाच्या भरात लक्ष्मणनं वडील अंथरुणावर झोपले असताना लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

(पाहा :VIDEO: चंद्रकांत पाटलांनी 'हा' बालिशपणा सोडून द्यावा; धनंजय मुंडेंचा टोला)

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प दाव्याची संसदेत केली पोलखोल, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...