S M L

धक्कादायक! जवानाच्या पत्नीनं घेतलं स्वतःला पेटवून, चिमुरड्यांनीही मारली आईला मिठी

स्वातीने घरात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतलं आणि त्यांच्या मुलांनी त्यांना त्यावेळी मिठी मारली होती. त्यामुळे यामध्ये स्वातीसह त्यांच्या मुलांचाही मृत्यू झाला आहे.

संदीप राजगोळकर संदीप राजगोळकर | Updated On: Apr 19, 2019 09:07 AM IST

धक्कादायक! जवानाच्या पत्नीनं घेतलं स्वतःला पेटवून, चिमुरड्यांनीही मारली आईला मिठी

कोल्हापूर, 19 एप्रिल :  कोल्हापूरमध्ये जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर बाब म्हणजे पत्नीने आत्महत्या करताना आपल्या 2 मुलांनादेखील पेटवून घेतलं. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावातील ही घटना आहे. स्वाती पाटील असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर विभावरी आणि देवांश अशी मृत मुलांची नावं आहेत. तर महिलेने इतकं टोकाचं पाऊल उचलत आपल्या मुलांसोबत आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा : मुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू


स्वाती यांचा विवाह लष्करी सेवेमध्ये असणाऱ्या महेश पाटील यांच्याशी 2012मध्ये झाला. महेश हे राजस्थानमध्ये सेवा बजावत आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास दोन्ही मुलांना घरात घेतलं. त्यावेळी स्वाती यांचे सासू-सासरे घरात नव्हते. स्वातीने घरात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतलं आणि त्यांच्या मुलांनी त्यांना त्यावेळी मिठी मारली होती. त्यामुळे यामध्ये स्वातीसह त्यांच्या मुलांचाही मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तर स्वाती आणि मुलांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

यासाठी पाटील कुटुंबीयांची आणि त्यांच्या शेजाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Loading...


VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2019 09:02 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close