वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईट नोटमध्ये व्हटकर यांनी नमूद केलंय

  • Share this:

21 एप्रिल : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये. संजय व्हटकर असं या कर्मचाऱ्यांचं नाव आहे.

या प्रकरणी 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सोलापूर महापालिकेत वरिष्ठांच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराला कंटाळून आरोग्य विभागातील संजय व्हटकर या कर्मचाऱ्याने  तिलाटी येथील रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

आपल्या आत्महत्येला सहाय्यक आयुक्त अभिजीत हराळे, सफाई अधिक्षक हराळे आणि निवृत्त अधिक्षक राजू सावंत यांना व्हटकर यांनी जबाबदार धरलंय.

या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईट नोटमध्ये व्हटकर यांनी नमूद केलंय. या सुसाईट नोटच्या आधारे तिन्ही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 05:53 PM IST

ताज्या बातम्या