S M L

सोलापुरात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण,दोन एसटी गाड्यांची तोडफोड

मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवावे अशी भूमिका घेत सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापुरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केलंय.

Updated On: Jul 21, 2018 02:24 PM IST

सोलापुरात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण,दोन एसटी गाड्यांची तोडफोड

सोलापूर, 21 जुलै : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवावे अशी भूमिका घेत सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापुरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केलंय. तसंच छत्रपती संभाजी महाराज चौकात मुंडन आंदोलन करण्यात आलेय. गेले वर्षभर मूक पध्दतीने मोर्चे करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांनी आता आंदोलनाला हिंसक वळण दिल्याचे पहायला मिळतेय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड करून आंदोलनाला हिंसक वळण लावले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला.

दरम्यान या घटनेनंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलीय. या घटनेनंतर सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्याना दिलेल्या इशाऱ्याकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहतेय.

हेही वाचा

पुन्हा एकदा गो- तस्करीच्या संशयातून मुस्लिम तरुणाचा बळी

Loading...
Loading...

मुख्यमंत्र्याच्या महापूजेला मराठा,धनगर समाजाचा विरोध कायम

अमूलनेही घेतली राहुल- मोदींच्या भेटीची दखल

तसंच औरंगाबादेतही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकार्ययांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन सुरू झाले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीला पूजेला येऊ देणार नाही या भूमिकेवर आंदोलन ठाम आहे. पंढरपुरात बाळाचा वापर झाला तर मराठा समाज त्यासाठी तयार असल्याचे मोर्चा आयोजकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2018 02:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close