अभ्यासात जिंकली पण परिस्थितीने हरवलं, फी न भरता आल्याने 89 टक्के मिळवणाऱ्या तरुणीची आत्महत्या

तिचा बीटेकचा प्रवेशही निश्चित झाला होता. पण आर्थिक स्थितीने साथ दिली नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 03:58 PM IST

अभ्यासात जिंकली पण परिस्थितीने हरवलं, फी न भरता आल्याने 89 टक्के मिळवणाऱ्या तरुणीची आत्महत्या

सोलापूर, 24 जुलै : उच्चशिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने सोलापुरातील एका तरुणीने आत्महत्या केली आहे. बीटेक होण्याचं स्वप्न पाहिलेल्या रूपाली पवार हिने विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर रूपाली पवार हिने सीईटी परीक्षेतही चांगले गुण मिळवले. त्याआधारेच तिचा बीटेकचा प्रवेशही निश्चित झाला होता. पण आर्थिक स्थितीने साथ दिली नाही. प्रवेश निश्चित झाल्यानंतरही आवश्यक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने नैराश्य आलेल्या रूपालीने परिस्थितीसमोर हात टेकले आणि आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

पालकांनी शेतीही काढली होती विकायला

रूपालीला पुढील शिक्षण घेता यावं, यासाठी तिच्या पालकांनी शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. पण जमिनीला भावच न मिळाल्याने पवार कुटुंबीय ती जमीन विकू शकले नाहीत. या सगळ्यात रुपालीची फी भरणं त्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे आधी मोठी मेहनत घेऊन चांगले गुण मिळवणारी रूपाली निराश झाली आणि तिनं आत्महत्या करत आपल्या आयुष्यालाच पूर्णविराम दिला.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवासांमध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्रच वाढताना दिसत आहे. मागील वर्षी झालेला कमी पाऊस आणि यंदाही पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

Loading...

VIDEO: जिवाशी खेळ! नागपंचमीला येथे अंगाखांद्यावर खेळतात विषारी साप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: solapur
First Published: Jul 24, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...