सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला

शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नामांतराच्या निषेधार्थ रिक्षाच जाळली आहे.

  • Share this:

सोलापूर,13 नोव्हेंबर:  - सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद चिघळला आहे.   शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नामांतराच्या निषेधार्थ  रिक्षाच जाळली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर  सोलापुरात मोठा वाद निर्माण झालाय. विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव न दिल्याने शिवा संघटनेने आज सोलापूर बंदची हाक दिली आहे. त्यातच या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं  आहे. त्यामुळे शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे.

२००४ साली विद्यापीठाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सोलापुरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती असा दावा शिवा संघटनेने केलाय. पण आता सोलापुर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव दिल्याने शिवा संघटनेकडून निषेध व्यक्त केला जातो आहे. जर का सोलापूर विद्यापीठाला सिध्देश्वरांचे नाव दिले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु असा इशारा शिवा संघटनेने दिला होता. त्यामुळे सोलापुरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. शिवा संघटनेला आणि लिंगायत समाजाला  बंद न पुकारण्याची विनंती पोलिसांनी केली होती.

या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने आता सोलापुराच्या विद्यापीठाच्या नामांतराचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 12:37 PM IST

ताज्या बातम्या