मोहिते पाटलांनंतर सोलापुरातील 4 नेते युतीच्या संपर्कात, एकाने घेतली भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट

मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने माढ्याची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली.

  • Share this:

लोकसभा निवडवणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या बाजूने स्वत:ची ताकद उभी केली.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या बाजूने स्वत:ची ताकद उभी केली.

मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने माढ्याची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली.

मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने माढ्याची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली.

आता आगामी विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटलांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील चार नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

त्यातच आता काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. म्हेत्रे हे सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

युतीच्या संपर्कातील इतर नेते- 1. रणजित शिंदे : माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र असून ते भाजपतून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

युतीच्या संपर्कातील इतर नेते- 1.रणजित शिंदे : माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र असून ते भाजपतून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

2. भारत भालके : काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र आगामी विधानसभेला भाजपच्या मार्फत शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. 2004 साली शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.

3. रमेश कदम : राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी शिवसेनेतून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 01:56 PM IST

ताज्या बातम्या