अजब! भटक्या कुत्र्यांना खाणं दिलं म्हणून 3.50 लाखांचा दंड

भटक्या कुत्र्याला खायला दिलं म्हणून तब्बल 3.50 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 04:37 PM IST

अजब! भटक्या कुत्र्यांना खाणं दिलं म्हणून 3.50 लाखांचा दंड

मुंबई, 14 एप्रिल : कुत्रा हा प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. कुत्र्यावर प्रेम करणारे देखील अनेक जण आपल्याला दिसतात. सध्या अनेक ठिकाणी भटके कुत्रे दिसून येतात. मुंबईतील रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची काही कमी नाही.

रस्त्यावरून जाणाऱ्या – येणाऱ्या पादचाऱ्यांकडून दिलेल्या खाण्यावर ते जगतात. त्यांचा वाढता त्रास लक्षात घेता सोयायट्यांनी काही नियम आखले आहेत. त्यानुसार त्यांना खाऊ घालणाऱ्याला दंड देखील केला जातो.

पण, हा दंड किती असेल यांचा केव्हा विचार केलाय? 200, 500, 1000 किंवा 2000 नाही का? पण, थोडं थांबा. कारण, कुत्र्याला खाऊ घातलं म्हणून इमारतीतील दोन व्यक्तींना तब्बल 3.50 लाखांचा दंड करण्यात आला. विश्वास नाही ना बसत? पण, ही बाब सत्य आहे.

मुंबईतील कांदिवली परिसरात सोसयटीनं हा दंड ठोठावला आहे. सोसायटीच्या नियमानुसार 2500 रूपये दंड आकारला जातो. दरम्यान, दंडाचा आकडा पाहिल्यानंतर तुम्हा धक्का बसला ना?

जगातील सर्वात धोकादायक पक्षाने केला हल्ला, एकाचा मृत्यू

Loading...

दंड वेळेवर न भरल्यास व्याज

कांदिवलीतील महावीरनगरमध्ये हा सारा प्रकार घडला आहे. भटक्या कुत्र्याला खाऊ घातलं म्हणून हेवन को.ऑ. हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या नेहा यांना 3 लाख 26 हजार रूपये, घरातील सदस्य केतन शहा यांना 7500 रूपये दंड ठोठावण्यात आला. शिवाय, दंड एकत्र न भरल्यास दर महिना 21 टक्के व्याज आकारलं जाणार आहे.

दरम्यान, याबाबत नेहा यांना विचारले असता त्यांनी आम्ही खायला घातलेले कुत्रे हे सोसायटीमध्ये जन्माला आलेले आहेत. शिवाय, त्य़ांचा वावर देखील याच सोसायटीमध्ये असतो. याप्रकरणी आता कायदेशीर बाबी देखल तपासल्या जात असल्याचं नेहा यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय होणार? हे पाहावं लागणार आहे.

VIDEO : गिरीश महाजन पुन्हा चर्चेत, लेझीम खेळत ट्रॅक्टरही चालवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dogmumbai
First Published: Apr 14, 2019 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...