S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

VIDEO : बापरे!,अंगणवाडीच्या पोषण आहारात शिजवला साप ?

खिचडी खातांना एका मुलाच्या ताटात साप दिसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी अंगणवाडी सेविकाही गैरहजर होती.

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2018 03:57 PM IST

VIDEO : बापरे!,अंगणवाडीच्या पोषण आहारात शिजवला साप ?

नाशिक, 05 जुलै : आपल्या जेवणात जर खडा सुद्धा आला तर घास आपण थुंकून देतो. पण इगतपुरीमध्ये एका अंगणवाडी पोषण आहारात चक्क साप शिजवल्याची किळसवाणी घटना घडलीये. सकाळी खिचडी खातांना एका मुलाच्या ताटात साप दिसल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. इगतपुरीतील तळेगाव अंगणवाडीत ही धक्कादायक घटना घडली.

या अंगणवाडीत 15 लहान मुलं आहे. नेहमीप्रमाणे मुलांसाठी खिचडी शिजवली. मुलांना खाण्यासाठी खिचडी वाढण्यात आला. पण खिचडी खातांना एका मुलाच्या ताटात  साप दिसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी अंगणवाडी सेविकाही गैरहजर होती.

अंगनवाडीत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केलंय. तसंच या अंगणवाडीत बालविकास प्रकल्प अधिकारी दाखल झाले आहे. खिचडी शिजवता हा साप कुठून आला ? कुणी टाकला याचा तपास सुरू आहे.हेही वाचा

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2018 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close