News18 Lokmat

ज्याने साप पकडण्याचं शिकवलं, त्याचाच सर्पदंशाने मृत्यू

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2018 05:43 PM IST

ज्याने साप पकडण्याचं शिकवलं, त्याचाच सर्पदंशाने मृत्यू

प्रशांत बाग, 05 आॅक्टोबर : ज्याने आजपर्यंत हजारो साप पकडून अनेक सापांना जीवदान दिलं. एवढंच नाहीतर साप कसा पकडायचं याच प्रशिक्षणही दिलं अशा विख्यात सर्पमित्र विक्रमसिंग मल्होत्राचा सर्पदंशाने मृत्यू झालाय.आपल्या मित्राकडे आला असताना साप पकडण्याच्या नादातच विक्रमसिंगचा मृत्यू झाल्यानं सर्पमित्रांमध्ये खळबळ उडाली आहे.

विक्रमसिंग मल्होत..जगविख्यात सर्पमित्र..आपल्या यु ट्युब चॅनलच्या माध्यमातून जगभरातील सर्पमित्रांना विक्रम प्रशिक्षण द्यायचा आणि त्यांना मार्गदर्शन देखिल करायचा. मात्र नाशिकमध्ये आपल्या मित्राकडे आलेला असताना एका डोंगरावर विक्रम साप पकडण्यासाठी गेला आणि त्याच ठिकाणी सर्पदंशानं त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, विक्रमला सर्पदंश झाल्याननंतर तात्काळ नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. विक्रमसारख्या साप पकडण्यात तज्ञ असलेल्या व्यक्तिचा असा मृत्यू झाल्यानं सर्पमित्रांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी नाशिक पोलीस करत आहेत.

मात्र, जगभरातील सर्पमित्रांना प्रशिक्षण देणाऱ्या विक्रमसिंगला नेमका सापाने चावा घेतला तरी कसा याबाबत आजही गुढ कायम आहे.

Loading...

========================================================

दोघांनी एका तरुणाला दगडांनी केली मारहाण, धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 05:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...