कृत्रिमरित्या अंडी उबवून कवड्या सापांच्या पिलांचा जन्म!

कृत्रिमरित्या अंडी उबवून कवड्या सापांच्या पिलांचा जन्म!

दुर्मिळ अश्या पिवळ्या ठिपक्याच्या कवड्या सापाच्या अंड्यांना कृत्रिमरित्या उबवून त्यातून 2 पिलांनी जन्म दिला, ही किमया अमरावती येथील सर्पमित्रांनी करून दाखवली आहे

  • Share this:

संजय शेंडे,अमरावती,11 जून : दुर्मिळ अश्या पिवळ्या ठिपक्याच्या कवड्या सापाच्या अंड्यांना कृत्रिमरित्या उबवून त्यातून 2 पिलांनी जन्म दिला, ही किमया अमरावती येथील सर्पमित्रांनी करून दाखवली आहे हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे.

अमरावती येथे एका घरात पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप निघाला.

पोटात अंडी असल्याने सापाची गती मंदावली होती. त्याला पकडण्याच्या नादात लोकांनी त्याला इजा केल्याने त्याने त्या ठिकानी सापाने 2 अंडी दिली. हेल्प फाऊंडेशनचे रत्नदीप वानखडे यांनी सापाची सुटका करून ती अंडी घरी आणली, त्या दोन्ही अंड्यांना तब्बल 51 दिवस एक विशिष्ट तापमानात हुमीडिटी बॉक्स तयार करून ठेवले.

या अंड्यातून रविवारी 2 पिलांनी जन्म दिला, त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या व केवळ महाराष्ट्राच्या काही भागातच आढळणाऱ्या 2 सापांच्या पिलांना सर्पमित्र रत्नदीप वानखडेच्या अथक प्रयत्नाने जीवनदान मिळाले.

तब्बल 51 दिवस या अंड्यांचं संगोपन करून यातून ही 2 पिल्लं बाहेर निघाली.

 

या दोन्ही पिलांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले व ही दोन्ही पिल्लं जंगलात सोडून देण्यात आली,यासाठी वनविभागाने हेल्प फौंडेशन च्या सदस्यांचे आभारही मानलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 04:11 PM IST

ताज्या बातम्या