22 आॅक्टोबर : जीवो जीवस्य जीवनम असं म्हटलं आहे याची प्रचीती माथेरानमध्ये आली. माथेरानमध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळी इंदिरानगर परिसरात चंद्रकांत सुतार यांच्या घरासमोर झाडावर हिरव्या रंगाचा हरणटोळ जातीचा साप अन्नाच्या शोधात फिरत होता. त्याला माथेरानमध्ये आढळणारा दोन तोंडाचा साप दिसला आणि त्याला पकडून खाण्याचा प्रयत्न करत होता.
अर्ध्या तासाची दुतोंड्या सापाची धडपड अखेर व्यर्थ केली आणि हिरव्या हरण टोळने त्या सापाला फस्त केलं. फक्त असे सापच नाहीत तर भीमाशंकर अभयारण्यात आढळणारा शेकरू जातीचा प्राणी आता माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतोच.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा