पुण्यात स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा

सल्लागार कंपन्यांनी पाठ फिरवल्यानं योजनेचा बोजवारा उडाला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2017 09:50 AM IST

पुण्यात स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा

28 ऑक्टोबर: स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात देशात पुणे शहर दुसऱ्या स्थानावर राहिलं, पंतप्रधान मोदींनी पुण्यातून योजनेचा बिगुल फुंकला पण सल्लागार कंपन्यांनी पाठ फिरवल्यानं योजनेचा बोजवारा उडाला आहे.

मुख्य सल्लागार मॅकेनझीचे गेल्या 6 महिन्याचे पैसे थांबवले आहेत. तसेच विविध प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या 13 सल्लागार कंपन्या फिरकतही नाही आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी स्मार्ट सिटी सल्लागाराबाबत संचालक मंडळाला अंधारात ठेवलं असं म्हटलंय. मॅकेनझीने दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात होत असलेली कामे यात तफावत आहे असा आरोप होत आहे. स्वयंसेवी संस्थानीही सल्लागार नेमून उधळपट्टी करण्याच्या कारभारावर टीका केलीय.

त्यामुळे अशा परिस्थितीत आता पुण्याच्या विकासाच्या स्वप्नाचे काय होणार आणि स्मार्ट सिटी वास्तवात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...