बालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला

आर्वी येथे सहा वर्षीय बालकाला विवस्त्र करून तपत्या टाइल्सवर बसविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बालकांचा पार्श्वभाग भाजला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 02:30 PM IST

बालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला

वर्धा, 16 जून- आर्वी येथे सहा वर्षीय बालकाला विवस्त्र करून तपत्या टाइल्सवर बसविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बालकांचा पार्श्वभाग भाजला आहे. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. आर्यन खडसे असे पीडित बालकाचे नाव आहे. आर्यनवर सध्या त्याच्यावर आर्वी येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे हे प्रकरण?

गजानन खडसे (रा.राणी लक्ष्मीबाई वार्ड) यांचा सहा वर्षीय मुलगा आर्यन खडसे हा नेहमीप्रमाणे जोगना माता मंदिराच्या प्रांगणात खेळायला गेला होता. तिथे आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे आला. 'तू मंदिरातून पैसे चोरले, असे म्हणत त्याने आर्यनला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला विवस्त्र केले. त्याचे दोन्ही हातपाय बांधून मंदिराच्या आवारातील तपत्या टाईल्सवर बसविले. यात आर्यनचा पार्श्वभाग गंभीर भाजला. आर्यनला याला तातडीने सामान्य रुग्णालय हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे.

आर्वी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

शिक्षणासाठी पैसा नाही..हाताला काम नाही, नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

Loading...

गरिबीच्या नैराश्येतून 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना बीड जिल्ह्यातीस वडवणी तालुक्यातील परडी माटेगांव येथे सकाळी उघडकीस आली. संतोष अंगद कदम असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

दारिद्रय, शिक्षण शिकावे म्हटलं तर पैसा नाही आणि पैसा कमावावं म्हटलं तर हाताला काम नाही, घरात काय खावं यांची पंचाईत या कारणांमुळे या तरुणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे नातेवाईक सांगत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परडी माटेगांव येथील अंगद कदम यांचा एकुलता एक मुलगा संतोषने मध्यरात्री गावाशेजारील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.


खाकी वर्दीचा धाक दाखवून पोलिसाची कांदा विक्रेत्याला बेदम मारहाण VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2019 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...