S M L

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर!,बालसंगोपनासाठी मिळणार सहा महिन्यांची पगारी रजा

राज्य शासकीय सेवेतील महिली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचं मुल 18 वर्षांचं होईपर्यंत सहा महिन्यांची पगारी संगोपन रजा घेता येणाराय. राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Sonali Deshpande | Updated On: Jul 4, 2018 10:13 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर!,बालसंगोपनासाठी मिळणार सहा महिन्यांची पगारी रजा

नागपूर, 04 जुलै : राज्य शासकीय सेवेतील महिली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचं मुल 18 वर्षांचं होईपर्यंत सहा महिन्यांची पगारी संगोपन रजा घेता येणाराय. राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ घेता येणाराय.संगोपनाची रजा ही अर्जित रजा आणि अर्धवेतनी रजेला जोडून घेता येईल.बालसंगोपन रजेवर जाताना असलेलं वेतन रजेच्या काळात देखील कर्मचाऱ्यांना मिळेल. अपत्याचा जन्म, त्याचं आजारपण, शिक्षण, आदी कारणासाठी बालसंगोपन रजा देण्यात येईल.

हेही वाचा

पुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी

भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम

'तो' भूखंड सरकारचाच,कोणताही घोटाळा नाही -मुख्यमंत्री

काय आहेत रजेचे नियम?

  • शासकीय सेवेचे एक वर्ष पूर्ण झाल्यावरच या रजेचा लाभ घेता येईल.
  • रजा टप्प्याटप्प्याने घ्यावी लागणार
  • सहा महिन्यांची रजा सलग मिळणार नाही. वर्षातून जास्तीत जास्त दोन महिनेच ती घेता येईल. सहा महिन्यांची रजा टप्प्याटप्प्याने घ्यावी.

    लागणार आहे.

  • एखाद्या कर्मचाऱ्यास दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तर त्यांना दोनच ज्येष्ठ अपत्यांसाठी संगोपन रजा मिळेल. संपूर्ण सेवाकाळात सहा महिन्यांचीच बाल संगोपन रजा मिळेल. शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या रजेचा लाभ मिळेल.
  • बाल संगोपन रजेवर असताना मुलाचे १८ वर्षे वय पूर्ण झाल्यास त्या तारखेपासून पुढे सदर रजा लागू होणार नाही.
  • या रजा कालावधीत रजा प्रवास सवलत (एलटीसी)घेता येणार नाही.
  • बालसंगोपन रजा ही हक्क म्हणून मागता येणार नाही. सक्षम प्राधिकाºयाच्या पूर्व मान्यतेनेच ही रजा घेता येईल. दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊनच रजा मंजूर केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 09:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close