दुचाकीला वाचवण्याच्या नादात दोन कारचा भीषण अपघात, महिलेसह 6 ठार, 2 गंभीर

दुचाकीला वाचवण्याच्या नादात दोन कारचा भीषण अपघात, महिलेसह 6 ठार, 2 गंभीर

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन कार आणि बाईकचा विचित्र अपघात झाला. यात 5 जणांचा जागेवरच मृत्यु झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पालघरजवळ आंबोली येथे शुक्रवारी हा अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

  • Share this:

पालघर, 10 मे- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी दोन कार आणि बाईकचा विचित्र अपघात झाला. यात 6 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पालघरजवळ आंबोली येथे हा अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

दुचाकीला वाचवण्याच्या नादात झाला भीषण अपघात.. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आंबोली येथे एका कारने दुचाकीला वाचवण्याच्या नादात दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात 6 ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी 4 च्या सुमारास  अपघात झाला.

प्रतिभा परिमल शहा (70 ), राकेश परिमल शहा (50), नावनाथ रमाकांत नवले (25, रा. मोखाडा),आकाश चव्हाण (42, रा.कांदिवली) ,बी डी जाधव,(57 रा. पनवेल), दिलीप चंदने अशी मृतांची नावे आहेत. जिनल शहा (24, रा.  कांदिवली),नरेश नारायण सुपे (45,रा. जव्हार) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमाींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन मुंबई येथे हलवण्यात आले आहेत. मृतामध्ये पाटबंधारे खात्याचे कनिष्ठ अभियंता बी.डी.जाधव यांचा समावेश आहे.


धक्कादायक! कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमधील टिकटॉक VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 05:45 PM IST

ताज्या बातम्या