S M L

गडचिरोलीत ट्रक- जीपच्या अपघातात सहा ठार

Samruddha Bhambure | Updated On: May 7, 2017 11:52 AM IST

गडचिरोलीत ट्रक- जीपच्या अपघातात सहा ठार

07 मे : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली मार्गावरील उमानूर जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण जागीच ठारे झाले असून 8 जण जखमी झाले आहेत.

सिरोंचा तालुक्यातील एक लग्नसोहळा आटोपून गावकरी परतत असताना पहाटे 2 च्या सुमारास ट्रक आणि जीपमध्ये जोरदार धडक झाली. या गाडीत एकूण 14 जण बसले होते. समोरून अचानक ट्रक येत असल्याचे पाहून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण देचलीपेठा गावचे रहिवासी आहेत. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, ट्रॅक्सचा चक्काचूर झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 11:52 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close