बीटी बियाणे चौकशीसाठी नवीन एसआयटीची स्थापना

बीटी बियाणांमुळे कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आला होता

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 9, 2018 09:35 AM IST

बीटी बियाणे चौकशीसाठी नवीन एसआयटीची स्थापना

नागपूर,09 फेब्रुवारी:  बीटी बियाणांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आणखी एका एसआयटीची स्थापना केली आहे.या बीटी बियाणांमुळे कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता.

बीटी बियाणांमुळे कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आला होता. विशेषत: विदर्भातील यवतमाळ ,अमरावती ,वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं होतं. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी कीटकनाशकांचा  नको तितका वापर केला. या  घातक कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे  40 हून अधिक शेतकऱ्यांचा  मृत्यू झाला होता.

बेकायदेशीर बीटी  बियाणे विकण्याचा आरोप आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर होतो  आहे. या  माॅन्टेन्सो कंपनीची ही एसआयटी चौकशी करणार आहे.  ही एसआयटी राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख संजय बर्वे आणि  सहकृषी संचालक सुभाष नागरे  यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली आहे. ही  एसआयटी स्थापन करण्याची सुचना महाराष्ट्र सरकारने 7 फेब्रुवारीलाच दिली होती.

या एसआयटीमुळे आतातरी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 09:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close