टीव्ही रिमोटसाठी बहिणीने घेतला भावाला चावा

टीव्ही रिमोटसाठी बहिणीने घेतला भावाला चावा

हा वाद विकोपाला गेल्याने उबेद यांची बहिणी शहिनाने उजवून दंडाला कडकडून चावा घेतला.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

रत्नागिरी, 16 जानेवारी : टीव्हीच्या रिमोट कंट्रोलसाठी सख्ख्या बहिणीने भावाला चावा घेतल्याची धक्कादायक घटना दापोली तालुक्यातील कर्दे गावात घडली आहे.

कर्दे गावात राहणारे उबेद खतीब यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या घरातील टीव्हीचा रिमोट कंट्रोल काही दिवसांपूर्वी वापरा करिता आणला होता.

आज रिमोट मागायला त्यांची बहीण शहिना खतीब या आल्या असता, त्यांनी उबेद यांच्या पत्नीला धक्काबुक्की केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या नंतर उबेद यांच्या पत्नीने त्यांना बोलावून आणले, या नंतर उबेद आणि शहिना यांच्यात रिमोटवरून मोठा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने उबेद यांची बहिणी शहिनाने उजवून दंडाला कडकडून चावा घेतला.

याबाबत खतीब यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शहिना खतीब यांच्या विरोधात 324, 504 अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मोहन लाड करत आहेत.

============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 10:20 AM IST

ताज्या बातम्या