चंद्रकांत पाटील तोंडघशी, भाजप पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंना पाठिंबा

चंद्रकांत पाटील तोंडघशी, भाजप पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंना पाठिंबा

सिंधुदुर्ग भाजपने नितेश राणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 6 जुलै : आमदार नितेश राणे यांनी अभियंत्याला केलेली शिवीगाळ आणि चिखलफेक प्रकरणात भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर मिळाला आहे. कारण सिंधुदुर्ग भाजपने नितेश राणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा विरोध होऊ नये म्हणून भाजप नेते आणि महसूलमंत्री अभियंता शेडेकर यांच्या कुटुंबाची भेट घेत सरकार त्यांच्यासोबत असल्याचं दाखवून दिलं. पण आता सिंधुदुर्गमधील भाजप नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना घरचा आहे देत तुम्ही आधी महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करा, अशी मागणी केली आहे.

काय होती भाजपची खेळी?

सत्तेत राहून शिवसेनेनं विरोधाची भूमिका घेतल्यानंतर भाजपने कोकणातील मातब्बर नेते नारायण राणे यांना जवळ केलं. त्यानंतर राणेंचा भाजप प्रवेश होता-होता राहिला. अखेर भाजपने नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी देत खूश करण्याचा प्रयत्न केला. पण आता विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती निश्चित झाल्यानंतर भाजपने संधी साधत नारायण राणे यांना धक्का दिला आहे. नितेश राणे यांनी शिवीगाळ केलेल्या अभियंत्याच्या कुटुंबाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आणि राणेंनाही याद्वारे योग्य तो संदेश दिला.

अभियंत्याच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

'सरकार तुमच्या पाठीशी असून चुकीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,' अशी ग्वाही पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेडेकर कुटुंबाला दिली. 'जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार आणि सरकार अधिकाऱ्यांच्या पाठिशी आहेत. शेडेकर यांना पोलीस संरक्षण दिले असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार आहोत,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

काय आहे नितेश राणे आणि अधिकाऱ्यामधील वाद?

मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै)रोजी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.

रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 02:01 PM IST

ताज्या बातम्या