मालवण समुद्रकिनारी तब्बल 30 फुट लांबीचा देवमासा मृताव्यवस्थेत आढळला

मालवण समुद्रकिनारी तब्बल 30 फुट लांबीचा देवमासा मृताव्यवस्थेत आढळला

स्थानिक मच्छिमारांनी या माशाची पाहणी केली. त्यावेळी हा देवमासा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत झाल्याचं समजलं.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 31 मार्च : मालवण समुद्रकिनारी भला मोठा देवमासा मृतावस्थेत आढळून आला. तब्बल ३० फुटांचा हा देवमासा असल्याची माहिती समजतीये.

हा देवमासा तब्बल 30 फूट लांबीचा आहे. हा मृत देवमासा किनाऱ्यावर आल्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी या माशाची पाहणी केली. त्यावेळी हा देवमासा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत झाल्याचं समजलं. मात्र या देवमासाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत नेमकी माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

सध्या या माशाला प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं या माशाची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आहे.

दरम्यान, या माशाची विल्हेवाट कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रशासनाकडून सध्या चर्चा सुरू आहे. या माशाची दुर्गंधी तब्बल एक ते दीड किमीच्या परिसरात पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2018 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...