अब्दुल सत्तार व गिरीश महाजनांमध्ये बंदद्वार चर्चा, जामनेरात जाऊन घेतली भेट

अब्दुल सत्तार व गिरीश महाजनांमध्ये बंदद्वार चर्चा, जामनेरात जाऊन घेतली भेट

काँग्रेसमधून निलंबित आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथील निवासस्थानी भेट घेतली.

  • Share this:

भुसावळ, 2 जून- काँग्रेसमधून निलंबित आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथील निवासस्थानी भेट घेतली. सत्तार सकाळी 11 वाजता महाजन यांच्या निवासस्थानी आले. काही वेळ त्यांनी कार्यकर्त्यांसमोर महाजन यांचेशी चर्चा केली. नंतर महाजन त्यांना घेऊन मागील दाराने दुसरी खोलीत गेले. याठिकाणी उभय नेत्यांनी बंदद्वार तब्बल अर्धा तास चर्चा केली.मात्र, ही राजकीय भेट नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. आपण मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गिरीश महाजन यांच्या घरी आलो होतो, असे सत्तार यांनी सांगितले.

काय म्हणाले गिरीश महाजन?

बंद खोलीत अर्धा तास चाललेल्या चर्चेविषयी आमदार गिरीश महाजन यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, सत्तार हे आपले चांगले मित्र असून ते मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आले आहेत. सत्तार यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. योग्य पक्षाच्या ते शोधत आहे. मात्र, अचानक भेटीबाबत जास्त बोलण्यास महाजनांनी टाळले.

अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर..

काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमध्ये बंड पुकारले होते. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नाहीतर त्यांनी सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचीही भेट घेतली होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. आता विधानसभेच्या तोंडावर सत्तार यांनी आता भाजपची वाट निवडली आहे.


पुण्याच्या प्रसिद्ध 'एसपीज्'च्या बिर्याणीमध्ये आढळल्या अळ्या, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sillod
First Published: Jun 2, 2019 06:33 PM IST

ताज्या बातम्या