पार्थ पवारांचा पराभव निश्चित, अजित पवारांनी राजकीय संन्यास घ्यावा-श्रीरंग बारणे

पार्थ पवारांचा पराभव निश्चित, अजित पवारांनी राजकीय संन्यास घ्यावा-श्रीरंग बारणे

प्रतिस्पर्धी उमेदवार स्वतःचं मतदानही स्वतःला करू शकत नाही. त्यामुळे पार्थ पवार यांचा पराभव निश्चित असल्यामुळे अजित पवारांनी राजकीय संन्सास घेण्याचं आवाहन केले. आपलाच विजय होणार असल्याचा दावा बारणे यांनी यावेळी केला.

  • Share this:

गोविंद वाकडे (प्रतिनिधी)

मावळ, 29 एप्रिल- मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. बारणे यांनी यावेळी पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली.

ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत सोपी आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वतःचं मतदानही स्वतःला करू शकत नाही. त्यामुळे पार्थ पवार यांचा पराभव निश्चित असल्यामुळे अजित पवारांनी राजकीय संन्सास घ्यावा, असा टोला देखील बारणे यांनी लगावला. आपलाच विजय होणार असल्याचा दावा देखील  बारणे यांनी यावेळी केला आहे.

टीकेला पार्थ पवार यांचे उत्तर..

पार्थ पवार बाहेरच्या मतदार संघातील मतदार असल्याने ते स्वतःच मतदान स्वतःसाठी करू शकत नाहीत, बारणे यांनी केलेल्या टीकेला पार्थ पवार यांनी उत्तर दिलंय. त्याचं बरोबर मतदार पहिल्यांदाच निवडणुकीला समोर जातांना काय काय अनुभव आले आणि एकूण प्रचाराचा प्रवास कसा होता, हे सांगताना मतदार आपल्या बाजूने कौल देतील, असा विश्वास पार्थ ह्यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपले बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 15 विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, पूनम महाजन, गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, हिना गावित आणि हेमंत गोडसे यांची आज परीक्षा आहे.

तर दुसरीकडे, गजेंद्र सिंह शेखावत, गिरिराज सिंह, कन्हैय्या कुमार, अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव, उपेंद्र कुशवाहा, वैभव गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांचंही भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.


VIDEO: प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी बजावला मतदानाचा हक्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 01:08 PM IST

ताज्या बातम्या