S M L

शिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता ?

नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेला शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरची डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातही चौकशी होण्याची शक्यता आहे

Updated On: Aug 20, 2018 01:29 PM IST

शिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता ?

मुंबई,ता.20 ऑगस्ट : नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेला शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरची डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातही चौकशी होण्याची शक्यता आहे. सीबीआय ही चौकशी करू करते अशी माहिती सूत्रांनी दिलीय. नालासोपारा स्फोटक प्रकरणी पांगारकरला जालन्यातून अटक करण्यात आली होती. पांगारकरने स्फोटकांसाठी पैसा पुरवल्याचा सीबीआयचा संशय आहे. त्याला आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 28 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणानंतरच दाभोलकरांच्या मारेकऱ्यापर्यंत सीबीआय पोहोचू शकलं होतं. त्यामुळे सीबीआय आणि एटीस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत.

कोण आहे श्रीकांत पांगारकर?

  • श्रीकांत पांगारकर हा जालन्याचा असून शिवसेनाचा माजी नगरसेवक आहे.

Loading...

  • 2001 त 2010 अशी सलग दहा वर्ष तो शिवसेनेचा नगरसेवक होता. 2011मध्ये त्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.

  • नंतर तो हिंदू जनजागृती समितीत काम करायला लागला. तिथेच तो अधिक कडवा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

  • श्रीकांतचे जालन्यात स्वस्त धान्याचे दुकान आहे असून त्याचा जनसंपर्कही चांगला आहे.

  • मुलीच्या शिक्षणासाठी दोन वर्षांपूर्वी तो जालन्याहून औरंगाबादला स्थायिक झाला होता.

गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 01:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close