मुलींवर होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून संपवलं कुटुंब, भोसरी प्रकरणाला धक्कादायक वळण

पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन आईनं आत्महत्या केलेल्या प्रकरणास धक्कादायक वळण प्राप्त झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 11:01 AM IST

मुलींवर होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून संपवलं कुटुंब, भोसरी प्रकरणाला धक्कादायक वळण

वैभव सोनवणे

पिंपरी-चिंचवड, 28 जुलै :  पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन आईनं आत्महत्या केलेल्या प्रकरणास धक्कादायक वळण प्राप्त झालं आहे. या घटनेतील सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार झाल्याची माहिती उघड झाली आहे. शवविच्छेदन अहवालातून ही हादरवणारी बाब समोर आलेली आहे. मुलींवर होणाऱ्या अत्याचारालाच कंटाळून आईनं त्यांची हत्या करून नंतर आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुलींवर अत्याचार केली कोणी? ही माहिती अस्पष्ट आहे. यातील एक मुलीचं वय अवघं 9 वर्ष तर दुसऱ्या मुलीचं 7 वर्ष होतं आणि छोटा मुलगा 6 वर्षांचा होता.

(वाचा :मुंबई पोलीस देताहेत आता 'डांसबार'मध्ये पहारा)

पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा

दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलींच्या गुप्तांगातून प्रचंड रक्तस्त्राव सुरू होता. या सर्व घटनेच्या निरीक्षणासाठी पोलीस दलातील तीन जणांची असणं आवश्यक असते. पण ही समिती हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हती. परिणामी घटनेला बराच काळ उलटूनही याप्रकरणी आकस्मिक मृत्युचीच नोंद करण्यात आली आहे. भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दोन अधिकारी हॉस्पिटलमध्ये थांबून होते. पण लैंगिक अत्याचाराची बाब शवविच्छेदन अहवालात उघड झाल्यानंतरही बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा अद्याप नोंदवला गेला नाही.

Loading...

(वाचा :धक्कादायक!वाढदिवशीच मृत्यूचं गिफ्ट,मुंबईत मित्रांनीच केली मित्राची निर्घृण हत्या)

नेमकी काय आहे घटना?

आईसह तीन मुलांच्या आत्महत्येनं पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे एका आईनं स्वतःच्या तीन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं होतं. ही धक्कादायक घटना रविवारी (28 जुलै) दुपारच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वीच हे कुटुंबीय भोसरीत राहण्यास आले होते. रविवारी दुपारच्या सुमारास या महिलेने आधी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला गळफास लावला, त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. हे कुटुंब मूळचे कर्नाटकातील आहे.  महिलेने नायलॉनच्या दोरीने मुलांना गळफास लावला.

(पाहा : पुण्यात तब्बल 64 हजारांच्या बनावट नोटा जप्त; यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी)

VIDEO: धक्कादायक! हातपाय बांधून उलटं लटकवून ड्रायव्हरला अमानुष मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 10:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...