तावडे साहेब जरा इकडे लक्ष द्या - विद्यार्थी करताहेत जीवघेणा प्रवास!

तावडे साहेब जरा इकडे लक्ष द्या - विद्यार्थी करताहेत जीवघेणा प्रवास!

स्कुल चले हम... पण असा जीव मुठीत धरुन? देशाला स्वतंत्र मिळून ७० वर्ष उलटली. मात्र, भिवंडी तालुक्यातील सुमारे ५० विद्यार्थीना पाच किलोमीटर पायपीट करत शाळा गाठावी लागत असल्याचे घटना समोर आली आहे.

  • Share this:

भिवंडी, ता. 10 जुलै : देशाला स्वतंत्र मिळून ७० वर्ष उलटली. मात्र, भिवंडी तालुक्यातील सुमारे ५० विद्यार्थीना पाच किलोमीटर पायपीट करत शाळा गाठावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे विद्यार्थी भिवंडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायत हद्दीतून नदी ओलांडून शहापूर तालुक्यातील एका शाळेत शिक्षणासाठी जाताहेत. गेली 15 वर्षापासून ही समस्या गावकऱ्यांनी सरकार दरबारी मांडली. मात्र शासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तर 15 वर्षापासून सातत्याने सरकार दरबारी मांडल्या गेलेल्या या गंभीर समस्येकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कसाकाय कानाडोळा केला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मुंबई विमानतळावर विमानाला अपघात टळला

ट्रेनपासून ते प्लेनपर्यंत मुंबईतील पावसाचे लेटेस्ट अपडेट

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायत हद्दीतील बिजपाडा, बात्रे पाडा, रावते पाडा, ताडाची वाडी, बेडेपाडा या पाच आदिवासी पाड्यांवर सुमारे एक हज़ार लोकवस्ती असून त्यांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने सुमारे दोन किलोमीटर गुढघाभर पाणी व चिखल तुडवीत आपल्या घरी जावे लागते. तर गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौथीपर्यंत असून तेथे विद्यार्थीची पटसंख्या २७ असून यासाठी या शाळेत दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र पुढील शिक्षणासाठी विद्यार्थींना नदी ओलांडून शहापूर तालुक्यातील पिवळी येथील किल्ले माहुली शाळेत शिक्षणासाठी जात असून पावसाळ्यात नदीची पातळी वाढल्यास या विद्यार्थीना तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलावरून पायपीट करावी लागते. खळबळजनक बाब म्हणजे हि संपूर्ण वाट जंगलातून असल्याने सर्प दंशाची भीती सदैव विद्यार्थीच्या मनात असते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा जीवघेण्या समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

... म्हणून हरमनप्रीत कौरकडून काढून घेतली डीएसपीची नोकरी

Sonali Bendre Photo: कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटो

भिवंडी तालुक्यातील तानसा पाईपलाईन नजीकचे तालुक्यातील शेवटचे मैदे नावाचे गाव आहे. या गावाची मैदे कांदळी ग्रुप ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल पाच आदिवासी पाडे आहे. या पाड्यात एक हजारहुन अधिक लोकवस्ती असून बिजपाडा, बात्रे पाडा, रावते पाडा, ताडाचीवाडी, बेडे पाडा या वस्तीवर संपूर्ण नागरी सुविधांचा अभाव आहे. या गावात जाण्यासाठी गेल्या पंधरा वर्षात रस्ता बनविण्यातच आला नसल्याची बाब समोर आली आहे. पंधरा वर्षांपूर्वी एकदा खडीकरण झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. मात्र त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून फक्त आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील वस्तीवरील गरीब मजुरी करणाऱ्या आदिवासीना बारा महिने पायपीट करावी लागत असून पावसाळ्याच्या चार महिने या रस्त्यावर घुडघाभर पाणी साचत असल्याने त्यामधून कसाबसा रस्ता काढीत चिखल तुडवीत दोन किलोमीटर अंतरावरील आपल्या वस्तीवर पोहचण्याची जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

नाईट क्लबमध्ये आता या महिलांना 'NO ENTRY'

जेव्हा 18 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या क्रिकेटरच्या प्रेमात पडली माधुरी दीक्षित

विशेष म्हणजे या पाड्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही रस्ताच्या प्रश्न सुटला नसल्याने रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. या परिसरात नागरी सुविधा मिळाव्या म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आणि तब्बल २५ वर्ष प्रतिनिधित्व करीत असलेले आदिवासी विकास मंत्र्याना देखील पत्रव्यवहार करून समस्या मांडल्या, मात्र सर्वांनी या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे या पाच आदीवासी पाड्यावर रुग्णांचे पावसाळ्यात खूप हाल सोसावे लागत आहे. एखादा गावकरी आजारी पडल्यास त्याला चादरींची झोळी करून दोन अडीच किलोमीटर अंतरा वरील मैदे येथे आणल्यानंतर तेथून एखाद्या वाहनाने भिवंडी तालुक्यातील दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावे लागते. तर गरोदर महिला अश्या परीस्थित दगावण्याची शक्यता असून, याला जबाबदार रस्ता नसून राज्य शासन असल्याचा आरोप केला जात आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 07:21 PM IST

ताज्या बातम्या