युतीच्या जागावाटपाबद्दल आदित्य ठाकरे म्हणतात...

युतीच्या जागावाटपाबद्दल आदित्य ठाकरे म्हणतात...

महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याबरोबरच शिवसेना - भाजप युतीमध्येही काही मुद्द्यांवर संघर्ष झाल्याचं समोर येत आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसेना - भाजपमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 जून : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याबरोबरच शिवसेना - भाजप युतीमध्येही काही मुद्द्यांवर संघर्ष झाल्याचं समोर येत आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसेना - भाजपमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय प्रदूषण घालवलं, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुतीही केली.

भाजपचा नवा प्लॅन

आदित्य ठाकरे असं म्हणत असले तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेना – भाजप युतीत जागा वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे. लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार मित्रपक्षांना जागा सोडून 50-50चा फॉर्म्युला हा ठरलेला आहे. पण भाजपने मात्र आता नवा प्लॅन केला आहे.

चंद्रकांत पाटील यांचं विधान

यानुसार शिवसेना – भाजप 135 – 135 जागांवर लढतील. तर, मित्रपक्षांना 18 जागा देण्यात येणार असून त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबतचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरून युतीत ठिणगी पडली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी करार

शिवसेना - भाजपमध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी 144 -144 असा फॉर्म्युला ठरलेला होता. पण, चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पण, शिवसेना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या कराराची आठवण करू दिली जाणार आहे.

ऑक्टोबरमध्ये निवडणुका

लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी आणि उद्धव ठाकरे ठरवू तो निर्णय अंतिम असेल असं म्हटलं होतं. पण, आता भाजपमधील मंत्र्यांनी केलेल्या विधानावरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून शिवसेना – भाजपनं युतीचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.

==========================================================================================

SPECIAL REPORT: मोदींच्या 'जेम्स बॉन्ड'ला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या