औरंगाबादमध्ये शिवसेना-MIM मध्ये पुन्हा वाद, 'संभाजीनगर' नाव लावल्याने तणाव

औरंगाबाद या नावावर 'संभाजीनगर' अशी पाटी लावल्याने काल (रविवारी) रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 10:00 AM IST

औरंगाबादमध्ये शिवसेना-MIM मध्ये पुन्हा वाद, 'संभाजीनगर' नाव लावल्याने तणाव

औरंगाबाद, 1 जुलै : औरंगाबाद शहराच्या नावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण स्वतःला शिवसैनिक म्हणवऱ्या काही युवकांनी औरंगाबाद या नावावर 'संभाजीनगर' अशी पाटी लावल्याने काल (रविवारी) रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 2 वरील पाटीवर पिवळा रंग टाकून त्यावर संभाजीनगर अशी पाटी लावण्यात आली. ही पाटी लावणाऱ्याने आपण शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं आहे. रेल्वे स्थानकावरील हा प्रकार लक्षात येताच एमआयएमचे काही कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर पोहचले आणि त्यांनी ही बाब रेल्वे पोलिसांना सांगितली. या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

एमआयएमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संभाजीनगर नावाची पाटी तात्काळ हटवली. तसंच कायदेशीर कारवाई करू, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आता अनधिकृतपणे नाव बदलल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादचं नामकरण आणि वाद

औरंगाबाद शहराचं नामकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आग्रही आहे. या मागणीवरून औरंगाबदमध्ये अनेकदा वाद झाला आहे. तसंच हा मुद्दा आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांत गाजला आहे. त्यामुळे आगामी काळातही नामांतराच्या मुद्द्यावर औरंगाबादमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Loading...

महाराष्ट्रातील कोण-कोणत्या ठिकाणांच्या नामांतराची मागणी?

1. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यात यावं, अशी शिवसेनेची मागणी

2. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचं नाव द्या, भीम आर्मीची मागणी

3. पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करा, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी

4. पुणे शहराला जिजाऊंचा वसा आणि वारसा आहे त्यामुळे पुण्याचे नाव जिजामाता नगर करावे आणि नवी मुंबईचे छत्रपती शिवाजीनगर करावे अशी मागणी समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी केली होती.

VIDEO : आमदाराच्या भावाने महिला अधिकाऱ्याला केली बेदम मारहाण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...