उद्धव ठाकरेंची नवी रणनीती, शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्रीही करणार मार्गदर्शन

उद्धव ठाकरेंची नवी रणनीती, शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्रीही करणार मार्गदर्शन

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : शिवसेनेचा आज 53 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच इतर पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युतीची रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपाने एकदिलाने लढावं आणि मोठा विजय मिळवावा, यासाठी युतीचे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत आहेत.

दरम्यान, काल (मंगळवारी)मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेकडून अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारत शिवसेना वर्धापन दिन सोहळ्याला येण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतर पक्षातील नेते सहभागी होत असल्याचं पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, 'शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे,' असं म्हणत आजच्या 'सामना'तून शिवसेनेच्या वाटचालीबद्दल भाष्य केलं आहे.


VIDEO : विधानसभेतच भडकले अजित पवार, मुख्यमंत्र्यांचंही सडेतोड उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2019 08:33 AM IST

ताज्या बातम्या