S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

आयुष्यभर तुमच्या चपला उचलल्या, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर टीका

'ज्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणून हिणवलं त्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिल्याचं' टीकास्त्र आमदार सावंत यांनी पवारांवर डागलं.

Updated On: Apr 9, 2019 05:03 PM IST

आयुष्यभर तुमच्या चपला उचलल्या, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर टीका

सोलापूर, 09 एप्रिल : शिवसेनेचे आमदार तानाजीराव सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. गेल्या 50 वर्षात तुमच्या चपला उचलण्याशिवाय आम्ही काही केलं नाही अशी टीका सावंत यांनी केली आहे.

सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात शिवसेना-भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तानाजीराव सावंत यांनी ही टीका केली आहे. सावंत यांच्या या टीकेमुळे उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या.

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. तर आरक्षणाचा मुद्दा समोर आणत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेवर हल्लाबोल केला. 'ज्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणून हिणवलं त्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिल्याचं' टीकास्त्र आमदार सावंत यांनी पवारांवर डागलं.


तसंच आचारसंहिता संपल्यानंतर धनगर आरक्षण दिलं जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलं. तर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आता फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना तारण्यासाठी धडपड करत असल्याची टीकाही तानाजीराव सावंत यांनी केली आहे.

सोलापुरातील भाजप उमेदवाराची सभा, युवकाने गावातील समस्या सांगताच उडाला गोंधळ

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्‍वामी यांच्‍या सभेत गोंधळ निर्माण झाला. पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर येथे महास्वामी यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्‍यात आलं होतं. यावेळी एका युवकाने गावातील विकास कामांबद्दल प्रश्न विचारल्याने सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंढरपूरमधील प्रचारसभेत जयसिद्धेश्वर महास्‍वामी यांच्‍या भाषणावेळी एका युवकाने गावातील समस्‍या सांगत भरसभेत गोंधळ घातला. यामुळे भाजपची ही सभा आटोपती घेण्‍यात आली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी युवकाची समजूत काढून त्याला शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला.

एकीकडे नागरिक आपल्‍या समस्‍या सांगत असताना प्रचारसभेसाठी आलेले नेते मात्र स्टेजवरच आईस्‍क्रीम खाण्‍यात दंग होते. त्यामुळे भाजपच्या या नेत्यांवर मोठी टीका होत आहे.

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1


VIDEO: प्रियांकांच्या रॅलीत 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा; कार्यकर्ते आपसात भिडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close