शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन मुंबईत रद्द, राज्यात सुरू

मुंबईतील ढोल बजाव आंदोलन शिवसेनेने ऐनवेळी रद्द केलं असलं तरीही राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र शिवसेनेच्या वतीने बँकांसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2017 02:51 PM IST

शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन मुंबईत रद्द, राज्यात सुरू

10 जुलै : मुंबईतील ढोल बजाव आंदोलन शिवसेनेने ऐनवेळी रद्द केलं असलं तरीही राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र शिवसेनेच्या वतीने बँकांसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. पुण्यात लाभार्थींची यादी लवकरात लवकर जाहीर करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर शिवसेनेनं ढोल बजाव आंदोलन केलं.

तर औरंगाबादमध्येही शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवून शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम देण्याची मागणी करण्यात आली. सोलापुरातही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या प्रवेशद्वारावर जाऊन ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांना सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं. तर उस्मानाबादमध्येही जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल वाजवून शिवसेनेनं आंदोलन केलं.

मात्र हे आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावतेही उस्मानाबादमध्येच होते. आंदोलनात सहभागी होण्याऐवजी त्यांनी बैठका घेण्यातच धन्यता मानली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 02:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...