एका वर्षात सत्तेला लाथ मारून सेना पुन्हा सत्तेत येणार -आदित्य ठाकरे

" शिवसेना सरकारमध्ये असली, तरी पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असल्यासारखी आहे"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2017 03:06 PM IST

एका वर्षात सत्तेला लाथ मारून सेना पुन्हा सत्तेत येणार -आदित्य ठाकरे

15 डिसेंबर : एका वर्षात सत्तेला लाथ मारून शिवसेना स्वबळावर सत्तेवर येईल असा विश्वास युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय. पण सत्तेला लाथ कधी मारायची हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगरमध्ये शिवसेनेची सभा पार पडलीय. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला. इतर पक्षाप्रमाणे आपल्या खुर्च्या रिकाम्या राहात नाहीत. पोस्टरवरील जाहिराती फक्त पोस्टरवरच आहेत. राज्यात शेतकरी सुखी नाहीत. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. युवा वर्ग भरकटला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. व्यापाऱ्यांचे उद्योग डबघाईला आले आहेत.  शिवसेना सरकारमध्ये असली, तरी पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असल्यासारखी आहे असंही यावेळी आदित्य म्हणाले.

तसंच नोटबंदी, जीएसटीमुळे बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. मग कुठं गेला विकास ?, विकासाच्या नावाखाली अनेक अनुदाने बंद केली आहेत. नोटबंदीच्या निमित्ताने आमच्या महिलांच्या पर्सवर देखील सरकारने दरोडा टाकताय. आता आगामी काळात हे सहन होणार नाही अशा इशाराही आदित्य यांनी दिला.

राज्यात पुढचं सरकार शिवसेनेचंच असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...