'अवजड' दुखणं ! मंत्रिमंडळातील खातेवाटपामुळे शिवसेना BJPवर नाराज, घेतला हा निर्णय

maharashtra vidhansabha election : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून शिवसेनेची नाराजी भाजपला परवडेल का?

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 10:58 AM IST

'अवजड' दुखणं ! मंत्रिमंडळातील खातेवाटपामुळे शिवसेना BJPवर नाराज, घेतला हा निर्णय

मुंबई, उदय जाधव, 03 जून : लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा NDAनं विजय मिळवला. त्यानंतर खाते वापट करताना शिवसेनेला पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय दिलं गेलं. पण, त्यामुळे शिवसेना नाराज झाली आहे. या संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना नाराजी कळवली आहे. तसेच खातं बदलून मिळावं अशीही मागणी करण्यात आली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नाराजीची दखल भाजप घेणार का? शिवसेनेला खातं बदलून मिळणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2014मध्ये देखील शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय होतं. त्यावेळी अनंत गीते हे केंद्रात शिवसेनेचे मंत्री होते. पण, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिल तटकरे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता अरविंद सावंत यांची निवड शिवसेनेनं केंद्रात मंत्री म्हणून केली आहे.


विधानसभेच्या तोंडावर BJPची नवी रणनीती, पवारांचा कट्टर विरोधक पुण्याच्या पालकमंत्रिपदी?

विधानसभेसाठी सेनेची नाराजी परवडणारी नाही

परस्परांवर टीकास्त्र डागल्यानंतर देखील शिवेसेना – भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती केली. त्यामुळे राज्यात युतीला मोठं यश देखील मिळालं. पण, आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेनेची नाराजी मात्र राजकीय दृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

Loading...


उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 18 खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचं घेणार दर्शन

मनोहर जोशींनाही अवजड उद्योग मंत्रालय

केंद्रातलं अवजड उद्योग मंत्रालय आणि शिवसेना असं समीकरणच झालं आहे. याआधी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनाही अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हेच मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला आलं आहे.


SPECIAL REPORT: हिंदी भाषेच्या सक्तीवरून सरकारचा यूटर्न?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...