News18 Lokmat

निवडणुकीत शह दिल्यानंतर धैर्यशील मानेंनी घेतली राजू शेट्टींची भेट

धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 10:35 AM IST

निवडणुकीत शह दिल्यानंतर धैर्यशील मानेंनी घेतली राजू शेट्टींची भेट

कोल्हापूर, 29 मे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. पण त्यानंतर आता धैर्यशील यांनी राजकारणात आपल्यापेक्षा अनुभवी असणाऱ्या राजू शेट्टी यांची त्यांच्या निवासस्थानी जात सदिच्छा भेट घेतली आहे.

महाराष्ट्राला एक प्रगल्भ राजकीय परंपरा आहे. अनेक राजकीय नेत्यांचा पक्षांपलीकडे जात आपआपसांत चांगला संवाद असतो. याच राजकीय परंपरेला अनुसरून धैर्यशील माने यांनी निवडणुकीतील प्रतिस्पर्धी असलेल्या राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील 10 वर्षांपासून खासदार असलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला.

गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा पक्ष भाजपसोबत होता. पण ही निवडणूक मात्र त्यांनी आघाडीसोबत लढवली. निवडणुकीत हार झाली असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठीचं राजकारण आपण सुरूच ठेवणार आहोत, असं राजू शेट्टी म्हणतात. याबाबतची एक कविताही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.

"मी संत नाही शांत आहे

Loading...

गोतावळ्यातून दुरावलो

याची मनात खंत आहे

कट करून गाडलेल्या

बळीचा मी पुत्र आहे

" ज्याला फळं.. त्यालाच दगडं.."

हे जगाचं सूत्र आहे..

मी खचलो नाही

थोडासा टिचलो आहे ..

ते कोण मला बेदखल करणार ?

मी बळीराजाच्या काळजातच

घर करून बसलो आहे ..

म्हणून चला .. भूमीपुत्रांनो उठा

नवा एल्गार करू.. !

गोरगरिबांच्या हक्कासाठी

आजपासून संघर्षाचा

नवा अध्याय सुरू..."


VIDEO : राजू शेट्टी आणि राज ठाकरेंमध्ये पराभवानंतरची खलबतं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2019 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...