अमोल कोल्हेंनंतर शिवसेनेला दुसरा मोठा धक्का? आमदार काँग्रेसच्या वाटेवर

अमोल कोल्हेंनंतर शिवसेनेला दुसरा मोठा धक्का? आमदार काँग्रेसच्या वाटेवर

अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता एकाच आठवड्यात शिवसेनेला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 3 मार्च : विदर्भात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण वरोरा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे.

अभिनेते आणि शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता आमदार बाळू धानोरकर हेही लवकरच पक्षाला जय महाराष्ट्र करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात शिवसेनेला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादी प्रवेश

अभिनेते अमोल कोल्हे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती याआधीच सूत्रांकडून मिळाली होती. आता अखेर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

लोकसभा लढवण्याची शक्यता

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. . अमोल कोल्हे हे याआधी शिवसेनेत आहे. त्यामुळे हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

काही दिवसांआधी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमधील गोविंद बाग इथल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अभिनेते अमोल कोल्हे हेदेखील त्यांच्यासोबत होते.


VIDEO : 'अमेरिका लादेनबाबत पुरावे देतं तर आपण AIR STRIKE चे का नाही?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या