शिवसेनेची बैठक संपली, मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत!

बैठकीत मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत राहणार असल्याचे निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2018 06:58 PM IST

शिवसेनेची बैठक संपली, मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत!

मुंबई, ता. 30 जुलै : मराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. गृहराज्यमंत्री आणि सेनेचे कोकणातले नेते दीपक केसरकर यांच्यासह सेनेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर दुपारी ४ वाजता सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ सोडविण्यासंदर्भातले निवेदन दिले. बैठकीत मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत राहणार असल्याचे निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत सेनेनं नेमकी काय भूमिका घ्यावी, यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीला उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गी लावण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. कुठल्याही अहवालाची वाट न बघता, विशेष अधिवेशन बोलवावे असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

VIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुणाने पडल्या पाया !

इतर समाजाला दिलेल्या आरक्षणातून एक टक्काही कमी न करता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. यावेळी उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

हेही वाचा..

चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत !

प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका - उद्धव ठाकरे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close