मराठवाड्यात शिवसेना पराभूत, कोण घेणार जबाबदारी ?

अतंर्गत वाद, स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेणं, हे शिवसेनेला महागात पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी कोण घेणार हाच खरा प्रश्न आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2017 08:56 PM IST

मराठवाड्यात शिवसेना पराभूत, कोण घेणार जबाबदारी ?

21 एप्रिल : लातूर, परभणी आणि चंद्रपूर तीन महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेनेचा सपाटून पराभव झाला...अतंर्गत वाद, स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेणं, हे शिवसेनेला महागात पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी कोण घेणार हाच खरा प्रश्न आहे.

परभणी...लातूर...आणि चंद्रपूर महापालिकांचे निकाल आज लागले. या तीनही पालिकांमध्ये शिवसेनेचा सपाटून पराभव झाला. सेनेला तिन्ही महापालिकांमध्ये आपल्या आधीच्या जागाही टिकवता आल्या नाहीत. याआधी झालेल्या महापालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीत शिवसेनेला फारसं यश मिळालं नव्हतं, त्यामुळे या पराभावातून पक्ष काही शिकला नाही हेच पुन्हा सिद्ध झालंय.

मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला...परभणी आणि लातूरमध्ये जोर लावला असता तर शिवसेनेला चमकदार कामगिरी करता आली असती. परभणीत पालकमंत्री गुलाबराव पाटील वगळता सेनेचा एकही बडा मंत्री आला नाही. लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन भाजपची हवा निर्माण केली असताना.. नाराज असलेले संपर्कनेते दिवाकर रावते तिथे साधे फिरकलेही नाहीत तर चंद्रपुरात अस्तित्व कायम टिकवण्यासाठी शिवसेनेनं साधी धडपडही केली नाही.

तीनही पालिकांमध्ये शिवसेनेच्या स्थितीवर एक नजर टाकूया...

परभणीत शिवसेनेच्या आधी 8 जागा होत्या.यावेळी सेनेला फक्त 6 जागा मिळाल्या. लातूरमध्ये आधी 6 जागा होत्या यावेळी सेनेला तिथं आपलं खातंही उघडता आलं नाही. तर चंद्रपूरमध्ये शिवसेनेच्या पाच जागा होत्या त्याही कमी होऊन फक्त दोन जागा राखत सेनेनं लाज राखली. तीनही महापालिकांमधल्या सेनेच्या या पराभवाची जबाबदारी कोण घेणार हाच खरा प्रश्न आहे.

Loading...

महापालिकांमध्ये शिवसेनेची स्थिती

                     2012        2017

 परभणी            8            6

लातूर               6            0

चंद्रपूर              5            2

या तीनही पालिकांमध्ये तिकीट वाटपाची जबाबदारी ही शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंकडे होती. तिकीट वाटप करताना त्यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे सेनेचे कॅबिनेट मंत्री आणि स्टार प्रचारक तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. या अंतर्गत वादातच सेनेचं पानिपत झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...