...म्हणून शिवसेनेनं चक्क या कार्यालयात म्हशी घुसवल्या

शिवसेना थेट म्हशी घेऊन गोकुळ कार्यालयावर धडकली.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 01:32 PM IST

...म्हणून शिवसेनेनं चक्क या कार्यालयात म्हशी घुसवल्या

कोल्हापूर, संदीप राजगोळकर, 30 एप्रिल : कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. गोकुळ दूध संघानं पशुखाद्याच्या दरात वाढ केल्यानं शिवसेनेनं आंदोलनाचा निर्णय घेतला. ऐरवी शिवसेना मोर्चा म्हटलं की प्रचंड घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन असं समीकरण. पण, कोल्हापुरात गोकुळ दूध संघावर काढलेल्या मोर्चाची सर्वत्र जोरात चर्चा होती. कारण, यावेळी शिवसेना म्हशी घेऊन जोरदार घोषणाबाजी करत गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर धडकली. पशुखाद्य दरवाढ रद्द करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली. शिवाय, गाईच्या दुध दरामध्येही वाढ करण्याची मागणी शिवसेनेनं केली. पशु खाद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्याचे बजेट कोलमडणार असून पशुखाद्यामध्ये 100 रूपये दरवाढ अन्यायकारक असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. दरम्यान, यावर गोकुळ दूध संघ काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.


VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Apr 30, 2019 01:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...