उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर रामदास कदम दिल्लीला रवाना

महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत.

उदय जाधव उदय जाधव | News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 09:52 AM IST

उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर रामदास कदम दिल्लीला रवाना

मुंबई, 9 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी रामदास कदम हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत. पर्शियन नेट मासेमारी आणि एलईडी लाईटद्वारे होत असलेल्या मासेमारीला महाराष्ट्रातील मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे. यामुळेच कोकणातील मच्छीमार समुदायाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे.

निवडणुकीदरम्यान मच्छीमारांच्या नाराजीचा मुद्दा चिघळू नये यासाठी शिवसेना प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. सोमवारी रात्री उशिरा राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर आता मच्छीमारांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी रामदास कदम हे राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

रामदास कदम यांच्या दिल्ली भेटीत मच्छीमारांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का हे पाहावं लागेल. कारण या मागण्या पूर्ण न झाल्यास मच्छीमार समुदाय निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे.


Loading...

VIDEO: हे पार्सल 23 तारखेला घरी पाठवा; सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांच्यावर साधला निशाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...