शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या

शिवसेनेचे शहापूर शिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची निघृण हत्या झाल्याची घटना आज उघड झालीय. भिवंडी तालुक्यातल्या देवचोळे इथल्या जंगात त्यांचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला आहे.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 25, 2018 04:36 PM IST

शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या

शहापूर,ता.20 एप्रिल: अहमदनगरनंतर आता शहापूरमधल्या शिवसेना नेत्याच्या हत्येची घटना पुढं आलीय. शैलेश नामदेव निमसे असं या शिवसेना नेत्याचं नाव आहे. भिवंडी तालुक्यातील देवचोळे इथल्या जंगलात शहापूरच्या जंगलात त्यांचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात इसमाचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर पडले. मात्र त्यांचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील देवचोळे गावच्या हद्दीतील जंगलात जाळलेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी सापडला आहे. तर कार पाच किमी अंतरावरील घाडणे, चिंचवली गावच्या हद्दीत आढळून आली आहे.

उपतालुका प्रमुखाच्या हत्येची माहिती समजताच परिसरातील शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा निषेध केला. पोलीसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तिथून न्याय वैद्यक तपासणीसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना उपतालुकाप्रमुख निमसे यांचा खून पूर्वनियोजितपणे कट रचून केला आहे. असा आरोप ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील व पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close