कोकणात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून कोकणात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 11:33 AM IST

कोकणात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता

मुंबई, 14 मे : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले नसले तरीही आता राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच कोकणात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना नेते आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे जवळचे सहकारी बबन साळगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

नारायण राणे यांना शह देत शिवसेनेनं पुन्हा एकदा कोकणात आपवं पाळेमुळे घट्ट केली. राष्ट्रवादीत असलेल्या दीपक केसरकर यांनाही 2014 च्या निवडणुकीपूर्वी आपल्याकडे खेचलं. पण आता याच केसकरांचे समर्थक आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. याबाबत एका मराठी वाहिनीने वृत्त दिलं आहे.

कोण आहेत बबन साळगावकर?

बबन साळगावकर हे शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्या अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. ते सावंतवाडीचे तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याचं बोललं जातं.

दरम्यान, बबन साळगावकर हे विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती आहे. तसंच राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता आहे. असं झाल्यास या मतदारसंघात दोन मित्रच आगामी विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभा असल्याचं पाहायला मिळेल.

Loading...


SPECIAL REPORT : काँग्रेस आघाडीला राज ठाकरेंमुळे मिळणार का नवा 'हिरो'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: May 14, 2019 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...