शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुरुवारी बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 11:37 AM IST

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

अंबरनाथ, 2 ऑगस्ट : अंबरनाथमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणात त्याला अटकही करण्यात आली आहे. प्रधान पाटील असं या माजी नगरसेवकाचे नाव आहे.

अंबरनाथमध्ये एका महिलेने शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुरुवारी बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पोलिसांनी याची दखल घेत प्रधान पाटील याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी प्रधान पाटील याला अटक केली आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

(सविस्तर बातमी लवरकरच)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...