शिवसेनेला एकच मंत्रिपद देऊन भाजपने दाखवला ठेंगा

शिवसेनेला एकच मंत्रिपद देऊन भाजपने दाखवला ठेंगा

मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आज खातेवाटपही जाहीर झालं. या खातेवाटपामध्ये शिवसेनेला महत्त्वाचं खातं मिळेल आणि काही मंत्रिपदं मिळतील, अशी अपेक्षा होती पण सेनेची ही अपेक्षा फोल ठरली आहे.

  • Share this:

मुंबई,31 मे : मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आज खातेवाटपही जाहीर झालं. या खातेवाटपामध्ये शिवसेनेला महत्त्वाचं खातं मिळेल आणि काही मंत्रिपदं मिळतील, अशी अपेक्षा होती पण सेनेची ही अपेक्षा फोल ठरली आहे.

शिवसेनेकडून अरविंद सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांना रेल्वे मंत्रालयासारखं एखादं महत्त्वाचं पद मिळेल, अशी अपेक्षा होती पण अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचा अपेक्षाभंग झाला.

अवजड उद्योग मंत्रालय

अवजड उद्योग मंत्रालय हे खातंही महत्त्वाचं आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले असले तरी सेनेची नाराजी मात्र लपून राहिलेली नाही. मागच्या मंत्रिमंडळातही शिवसेनेचे अनंत गीते केंद्रात मंत्री होते आणि त्यांच्याकडेही अवजड उद्योग मंत्रालयच होतं. आताही याच पदावर शिवसेनेची बोळवण झाली.

जेडीयूने नाकारली ऑफर

एनडीए चे घटकपक्ष असलेल्या जेडीयूचे नेते नितिशकुमार यांनी आधीच भाजपने मंत्रिपदाबद्दल दिलेली ऑफर नाकारली होती. आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत नितिशकुमार हे मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यालाही हजर राहिले नव्हते.

नितिशकुमार यांच्याप्रमाणेच शिवसेनाही अशी भूमिका घेणार का, अशी चर्चा सुरू होती पण शिवसेनेने इतकी टोकाची भूमिका घेतलेली नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मनोहर जोशींनाही अवजड उद्योग मंत्रालय

केंद्रातलं अवजड उद्योग मंत्रालय आणि शिवसेना असं समीकरणच झालं आहे. याआधी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनाही अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हेच मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला आलं आहे.

==============================================================================

EXCLUSIVE VIDEO : शपथविधीनंतर अरविंद सावंत यांची पहिली प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या