News18 Lokmat

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; पालघरवर मात्र सस्पेन्स

शिवसेनेनं लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली असून पालघरच्या जागेवर मात्र सस्पेन्स कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 03:41 PM IST

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; पालघरवर मात्र सस्पेन्स

मुंबई, 22 मार्च : शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. पण, यावेळी पालघरच्या जागेवर उमेदवार कोण? याबाबत मात्र सस्पेन्स पाळण्यात आला आहे. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेनं परस्परांना आव्हान दिलं होतं. त्यावेळी श्रीनिवास वनगा यांनी भगवा हाती घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेसाठी श्रीनिवास वनगा हे उमेदवार असतील असं जाहीर केलं होतं. पण, सध्या मात्र पालघरची जागा ही भाजपकडे आहे. शिवसेनेनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये मात्र पालघरचा उमेदवार कोण? हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पालघरची जागा शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे कायम राहणार? यावर सस्पेन्स अद्याप देखील कायम आहे.


शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर

भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही लोकसभेसाठीच्या आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली यात 21 जणांचा समावेश आहे. सुभाष देसाई यांनी ही यादी जाहीर केली. इतर जागा रविवारी जाहीर करू असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेना राज्यातल्या लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 23 जागा लढविणार आहे.


Loading...

शिवसेनेचे उमेदवार

1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर

4) ठाणे - राजन विचारे

5) कल्याण - श्रीकांत शिंदे

6) रायगड - अनंत गिते

7) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

8) कोल्हापूर - संजय मंडलिक

9) हातकणंगले - धैर्यशिल माने

10) नाशिक - हेमंत गोडसे

11) शिर्डी - सदाशिव लोखंडे

12) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील

13) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

14) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

15) बुलढाणा - प्रतापराव जाधव

16) रामटेक - कृपाल तुमाने

17) अमरावती- आनंदराव अडसूळ

18) परभणी- संजय जाधव

19) मावळ - श्रीरंग बारणे

20) हिंगोली-हेमंत पाटील

21) उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर


भाजपने गुरुवारी देशातल्या 182 लोकसभा उमेदवारांची घोषणा केली त्यात महाराष्ट्रातल्या 16 जागांचा समावेश आहे. त्यात दोन नवे चेहेरे असून बाकी 14 जणांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय.


'...तर हेमा मालिनीसुद्धा पंतप्रधान झाल्या असत्या'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...