ठाणे, 12 जून : शिवसेनेसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये पाण्यावरून चांगलाच राडा झाला आहे. या भांडणात नगरसेविका प्रेमा म्हात्रेंनी शिवसेनेच्याच नगरसेविका आशालता बाबर यांच्या कानशिलात लगावली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालायबाहेरच घडला आहे.
पाण्यावरून महाराष्ट्रातील अनेक भागात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. याचं लोण आता ठाण्यासारख्या शहरी भागातही पोहचलं आहे. पाणीप्रश्नावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविका समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं.
नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि आशालता बाबर यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. पण नंतर प्रेमा म्हात्रे यांनी माझ्या कानशिलात लगावली, असा आरोप आशालता बाबर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे.
'मारहाण केलीच नाही'
मारहाण केल्याबाबत आशालता बाबर यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर प्रेमा म्हात्रे यांनी या प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. 'मी बाबर यांना मारहाण केलीच नाही,' असा दावा प्रेमा म्हात्रे यांनी केला आहे. आशालता बाबर माझ्यावर खोटा आरोप करत आहेत, असंही म्हात्रे यांचं म्हणणं आहे.
पुढील 24 तासांत कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता, इतर महत्त्वाच्या 18 घडामोड
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा