कुऱ्हाडीने वार करत शिवसेना नगरसेवकाची हत्या, गुन्ह्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर

अमरदीप रोडे असं नगरसेवकाचं नाव आहे. परभणी शहरातील जायकवाडी भागात हा प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींकडून कुऱ्हाडीने वार करत अमरदीप यांची हत्या करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 12:26 PM IST

कुऱ्हाडीने वार करत शिवसेना नगरसेवकाची हत्या, गुन्ह्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर

विशाल माने, प्रतिनिधी

परभणी, 31 मार्च : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैयक्तिक वादातून शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अमरदीप रोडे असं नगरसेवकाचं नाव आहे. परभणी शहरातील जायकवाडी भागात हा प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींकडून कुऱ्हाडीने वार करत अमरदीप यांची हत्या करण्यात आली आहे. अमरदीप आणि आरोपींमध्ये वैयक्तित वाद होते. त्याच रागात त्यांनी अमरदीप यांची निर्घृण हत्या केली.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी स्वत: नवा मोंढा पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्हाची कबुली दिली. पण त्यांना यानंतर त्यांना अटक करण्यात आली की नाही याबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान, अमरदीप रोडो यांची अधिक माहिती मिळाली असता त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या नावे अनेक गुन्हे आहेत. भांडण आणि दादागिरीमुळे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत. अशाच एका वादातून त्यांची हत्या झाल्याचं शक्यता वर्तवली जात आहे. पण यावर पोलीस काहीही बोलण्यास तयार नाहीत.

Loading...

तर पोलिसांनी घटनास्थळावरून अमरदिप यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.


VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले... 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...