शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत जुंपली.. एकाने लगावली दुसऱ्याच्या श्रीमुखात

महापालिकेच्या स्थायी समितीच्या टक्केवारी वरून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत जुंपली. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी आपल्याच पक्षाचे नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या श्रीमुखात लगावल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 04:57 PM IST

शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत जुंपली.. एकाने लगावली दुसऱ्याच्या श्रीमुखात

विनय म्हात्रे, (प्रतिनिधी)

नवी मुंबई, 13 जुलै- महापालिकेच्या स्थायी समितीच्या टक्केवारी वरून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत जुंपली. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी आपल्याच पक्षाचे नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या श्रीमुखात लगावल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

स्थायी समितीच्या वसुलीवरून हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. स्थायी समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे, तरी समितीची आर्थिक वसुली ही शिवसेनेचे दोन नगरसेवक करीत होते. अशाच ऐका कामाच्या टक्केवारीबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने नामदेव भगत यांनी थेट रंगनाथ औटी यांच्या श्रीमुखात भडकावली. या घडल्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे यांनी रंगनाथ औटी यांची समजूत काढल्याचे समजते. पक्षाची बदनामी होऊ नये, यासाठी हे प्रकरणाला मूठमाती देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारी भाषेत सांगून पाहिलं, आता शिवसेना स्टाईलमध्ये निघेल मोर्चा-उद्धव ठाकरे

पीक विम्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीवर शिवसेना आक्रमक झाली आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक होतेय. त्या संदर्भात आम्ही विमा कंपन्यांना इशाराही दिला. परंतु आजही अनेक प्रकरणे पूर्ण झालेली नाहीत. सरकारी भाषेत त्यांना सांगून पाहिलं, आता शिवसेना स्टाईल मोर्चा निघेल, असा सज्जड इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विना कंपन्यांना दिला आहे. या सर्व विमा कंपन्यांच्या मुख्यालयावर शिवसेनेकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या 17 जुलैला बीकेसीमधील विमा कंपनीच्या मुख्यालयावर शिवसेना महामोर्चा काढणार आहे. शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Loading...

झारीतील शुक्राचार्य असतील त्यांना दूर केले पाहिजे...

'आपला शेतकरी पोरका नाही, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी कर्जमाफी आणि प्रधानमंत्री फसल योजना,या दोन्ही योजना चांगल्या आहेत. पण या योजना ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. शिवसेनेचा हा मोर्चा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी असेल. दर वेळी शेतकरी मुंबईत मोर्चा घेऊन येतात. आता शिवसेना त्यांच्यासाठी महामोर्चा काढणार आहे. या योजनांमध्ये काही त्रृटी असतील तर त्यात सरकारमध्ये राहून सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या योजनामधील जे झारीतील शुक्राचार्य असतील त्यांना दूर केले पाहिजे. 17 जुलैला सकाळी 11 वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील भारतीय अँक्सा इन्शूरन्स कंपनीवर शिवसेनेचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या शासकीय पूजेला जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार..- निलम गोऱ्हे

मुख्यमंत्री सेनेचा की भाजपचा याबाबत मोठा खल सुरु असतानाच त्यात आता विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही उडी घेतलीय. दै. सामनामधून मुख्यमंत्री कोणाचा हे स्पष्ट केलेय. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्या मातोश्रीवरील बैठकीत सर्व गोष्टी ठरलेल्या आहेत त्यामुळे वेगळी चर्चा करायची गरज नाही असे स्पष्ट केलेय. तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात यावे, त्यांचे स्वागत असेल असेही निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलेय. उपसभापती झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच वारीला आल्यात. राज्यातील दुष्काळाचे सावट हाटू दे असं साकडं सावळ्या विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांनी घातलेय.

विद्यार्थिनींना छेडत होता, रोड रोमिओला मुली, पालक आणि स्थानिकांनी मिळून धुतला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2019 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...