S M L

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला शिवसेनेनं फासलं काळं

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2017 03:35 PM IST

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला शिवसेनेनं फासलं काळं

20 एप्रिल :  नागपुरमध्ये जप्त केलेलं हॉल तिकिट परत देण्यासाठी निर्लज्ज शिक्षकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली. ‘मुझे आप एक नाईट चाहिए’ अशा भाषेत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला चांगलाच चोप देण्यात आला.

नागपूरच्या धरमपेठ पॉलिटेक्निक काॅलेजमध्ये कॉपी करताना काही विद्यार्थिनी पकडल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांचं आय कार्ड या प्राध्यापकाने जप्त केलं होतं. मात्र हे परत करण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी त्यानं केली असल्याचा आरोप सेनेनं केला आहे.  महत्त्वाचं म्हणजे मुलीने या नराधम शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केल्यामुळे त्याचं बिंग फुटलं. त्यामुळेच रंगेहाथ सापडलेल्या या शिक्षकाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन त्याच्या चेहऱ्याला काळं फासून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close