शिवसेनेला लातूरमध्ये भोपळा, परभणीत 6 तर चंद्रपुरात दोनच जागा

शिवसेनेला लातूरमध्ये भोपळा, परभणीत 6 तर चंद्रपुरात दोनच जागा

"शिवसेनेला या तिन्ही निवडणुकीत अतिशय खराब कामगिरीला समोरं जावं लागलंय"

  • Share this:

21 एप्रिल :  लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकेचे निकाल जवळपास निश्चित झाले आहे. चंद्रपूर आणि लातूर जवळपास भाजपच्या हाती आली आहे तर परभणी काँग्रेच्या हाती आली आहे. मात्र शिवसेनेला या तिन्ही निवडणुकीत अतिशय खराब कामगिरीला समोरं जावं लागलं आहे.

शिवसेनेला लातूरमध्ये साधा भोपळाही फोडता आला नाही. परभणीत जेमतेम 6 जागा हाती लागल्या तर चंद्रपूरमध्ये फक्त दोनचं जागी उमेदवार निवडून आले आहे.

मात्र या निवडणुकीची सर्व धुरा असलेला शिवसेना नेते अनिल देसाई यांच्याकडे होती. त्यामुळे आता शिवसेनेच्या पराभवाचे खापर कोणावर फुटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लातूर महापालिकेचा अंतिम निकाल -एकूण जागा - 70

भाजप - 36, काँग्रेस - 33, राष्ट्रवादी - 01, शिवसेना - 00

एमआयएम - 00, इतर - 00

 परभणी महापालिका अंतिम निकाल - एकूण जागा - 65

काँग्रेस - 31, राष्ट्रवादी - 18, भाजप - 08, शिवसेना - 06

इतर - 02

चंद्रपूर महापालिका अंतिम  निकाल - एकूण जागा - 66

भाजप - 36, काँग्रेस - 12, राष्ट्रवादी - 02, शिवसेना - 02

बसपा - 08, मनसे - 02, प्रहार - 01, इतर - 03

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 04:53 PM IST

ताज्या बातम्या