देवेंद्र फडणवीसांनी केला 'मुख्यमंत्री'पदाबाबत सर्वात मोठा खुलासा

देवेंद्र फडणवीसांनी केला 'मुख्यमंत्री'पदाबाबत सर्वात मोठा खुलासा

जेव्हा वाघ आणि सिंह एकत्र येतो तेंव्हा राजा कोण असणार हे सांगायला नको. मग किती ही आघाड्या असो काहीही फरक पडणार नाही.

  • Share this:

मुंबई 19 जून : शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात मोठा खुलासा केलाय. आम्ही सर्व ठरवलं आहे. कुणाला काय चर्चा करायची ते करू द्या. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय सांगू असं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच खुलाचा केला. ते म्हणाले,  मी इथे आलोय तमाम शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी. आपल्या घरातही जेंव्हा दोन भाऊ एकत्र रहातात तेंव्हा कधी कधी ताण तणाव होतात. आत जो काही ताण तणाव होता तो आता दूर झालांय. जेव्हा वाघ आणि सिंह एकत्र येतो तेंव्हा राजा कोण असणार हे सांगायला नको. मग किती ही आघाड्या असो काहीही फरक पडणार नाही.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीला अभुतपूर्व विजय मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले.

एनडीए आणि महायुतीला मिळालेलं यश अभूतपूर्व. यशाचे शिल्पकार हे शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आहे. मला शिवसेनेच्या मेळाव्यात गेल्यावर मी घरी आलोय असं वाटतं. कारण आपण भगव्यासाठी आहोत. माझे गुरू भगवा आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. बाळासाहेबांनी राष्ट्रीयत्वच बीजरोपन केलं. महाराष्ट्र आणि राष्ट्र या संकल्पनेतून आपण सुरुवात केली आणि नंतर पक्ष. शिवसेना पक्ष वर्धिष्णू झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे ,समाजापर्यंत पोचत राहिला पाहिजे या शुभेच्छा. निवडणुकाकरिता एकत्र नाही तर महाराष्ट्रासाठी आलो. सरकारच्या मार्फत शेवटच्या व्यक्तिपर्यंत परिवर्तन करण्यात आले. ऑक्टोबरमध्ये न भूतो असा विजय जनता आपल्याला देणार आहे. आणि आपल्याला देशाच्या जनतेची सेवा करायची आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले,आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि तसेच आपण काम करत आहोत. दुष्काळात आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलो. पुन्हा निवडून आल्यावर  दुष्काळ पाहायला मिळणार नाही असं काम करायचं. दुष्काळाला भूतकाळ करायचा काम करायचं. मंत्री कोण?  मुख्यमंत्री कोण?  मीडियाला चघळू द्या. सुजलाम सुफलाम राज्याला करायचं असेल तर पुन्हा एकदा सत्ता आणायची. मी आणि उद्धव ठाकरे यांनी सगळं ठरवलंय, योग्य वेळी आम्ही ते सांगूच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या